R. O. NIKAM Private I.T.I.
Vision
Prof. Ravindra Onkar Nikam, Chairman, Onkar Bahu-Uddeshiya Vikas Sanstha, had a splendid vision of providing education and ample opportunities to the children and youth of India to excel globally in different profession.A Premier institute as a dynamic entity contributing in Human Resource Development and solution provider to industry and society.
Mission
To provide students with the fundamental knowledge, problem solving skills, business awareness and confidence required to be leaders in the global environment.
To maintain a collegial, supportive and diverse environment that encourages our students, faculty and staff to achieve to the best of their abilities.
</p> <p><center>NIT Video<center>
EVENTS & NEWS..
संपूर्ण जगात कचरा हि एक मोठी समस्या आहे रोज निर्माण होणार्या कचर्या पैकी ३५ टक्के कचरा हा प्लास्टिक चा आहे. स्वस्त आणि उपयुक्त वाटणार प्लास्टिक हे आज आपल्या साठी एक मोठी चिंतेची बाब ठरते आहे.आपल्या रोजच्या जीवनात अनेक प्लास्टिक च्या वस्तूंचा अंतर्भाव होतो पिण्याच्या पाण्याच्या बाटली पासून तर भाजी आणायच्या पिशवी पर्यंत प्लास्टिक ने आपले संपूर्ण विश्वच व्यापून टाकलय रोज निर्माण होणार्या या प्लास्टिक च्या कचर्याचे भयानक परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत.
गणेश उत्सवा निमित्त जनजागृती अभियानाचा जागरएकी कडे EVM मशीनमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी अनेक राजकीय पक्षांकडून केल्या जातात. EVM द्वारे मतांची अफरातफर होते असा आरोप वारंवार केला जातो. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेता अशा परिस्थितीत जनतेची मतदान प्रक्रियेवर विश्वासार्हता अबाधित राहण्यासाठी शासनाच्या वतीने इ व्ही एम सोबत आता VVPAT चा वापर सुरु केला आहे. त्याची माहिती सामन्यात पोहचावी या साठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज दिनांक ०२ जानेवारी २०१९ रोजी ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित प्रा रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये शासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली
प्रा रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये इ व्ही एम व व्ही व्ही पॅट जण जागृती अभियानाअंतर्गत कार्यशाळा संपन्नप्रा.रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्सटीट्युशन्स मधील युवा वर्गाने विधायक पाऊल उचलत केले नव वर्षाचे स्वागत धुळे :- वर्ष अखेरीचा जल्लोष आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईच्या उर्जेचा सकारात्मक उपयोग करून घेत येथील ओंकार बहु उद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र ओंकार निकम यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी येथील तहसील कार्यालय, येथे अवयव दान जनजागृती अभियानाची सुरुवात केली तसेच येथील परिसरात स्वच्छता अभियान राबविले सदर अभियानाचे उद्घाटन मा.तहसीलदार श्री.अमोल आर .मोरे, निवासी नायब तहसीलदार मा.श्री नरेंद्र उपासनी व ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे मा.सदस्य श्री रोहित रवींद्र निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
अवयव दान जनजागृती अभियान व स्वच्छता मोहिमेतून नववर्षाचे आगळे वेगळे स्वागत ...!धुळे :- गोंदूर येथील ओंकार बहु उद्देशीय विकास संस्था संचालित प्रा.रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत असलेल्या निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलोजी ( पोलिटेक्निक ), आर.ओ.निकम ज्युनिअर कॉलेज , निकम पब्लिक स्कुल, प्रा.रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी (बी-फार्मसी व डी-फार्मसी ) , यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्थरीय बुद्धिबळ ,वादविवाद ,पोस्टर प्रेझेंटेशन, बॉक्स क्रिकेट, रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन दिनांक 07 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन दैनिक पुण्यनगरी धुळे चे संपादक विलास हैबतराव पवार , कलाध्यापक,विकास विद्यालय, नरडाणा ता.शिंदखेडा जि.धुळे संस्थापक अध्यक्ष श्री.राहुल हिम्मतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०:३० वाजता करण्यात आले या वेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र ओंकार निकम ,सचिव सौ शुभांगी निकम ,प्राचार्य प्रकल्प पाटील, प्राचार्य सागर जाधव , प्राचार्य डॉ .विशाल बडगुजर, इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भव्य आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात संपन्न…शिक्षणा सोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या साठी खेळ अतिशय महत्वाचा म्हणूनच दरवर्षी महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई तर्फे इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टूडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने आंतर महाविद्यालयीन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते त्या अंतर्गत खो-खो व कब्बडी या स्पर्धांचे आयोजन शहरा पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गोंदूर येथील प्रा.रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अंतर्गत असलेल्या निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि (पॉलीटेक्नीक ) व प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी (डी -फार्मसी ) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
निकम इन्स्टिट्यूशन्स मध्ये एफ -झोन विभाग स्थरीय खो-खो व कबड्डी स्पर्धांचे आयोजन ..ओंकार बहु उद्देशीय विकास संस्था संचलित प्रा.रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अंतर्गत असलेल्या निकम इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि (पॉलीटेक्नीक ), प्रा.रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी (बी -फार्मसी व डी-फार्मसी), आर.ओ.निकम जुनिअर कॉलेज व निकम पब्लिक स्कूल च्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन समारंभ KARWAA २०१९ दिनांक २४ जून रोजी संपन्न झाले.
वार्षिक स्नेह संमेलन " karwaa २०१९ " कार्यक्रमात नृत्य आविष्कारांची मोहिनी प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये स्नेहसंमेलन संपन्न ...ओंकार बहु उद्देशीय विकास संस्थेच्या निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पॉलिटेक्निक) महाविद्यालया तर्फे दिनांक १२ मार्च २०१९ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील प्रसिद्ध भारत गिअर्स या कंपनीचे एच. आर.प्रतिनिधी , एडमिन ऑफिसर व प्रॉडक्शन मॅनेजर यांनी इंटरव्ह्यू साठी उपस्थित विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व मुलाखती द्वारे निवड केली ज्यात निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाच्या २८ तर इतर महाविद्यालाच्या २३ विद्यार्थ्यांची नौकरी साठी निवड करण्यात आली.सलग चवथ्या वर्षी निकम (पॉलिटेक्निक) तर्फे या नामांकित कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन केले व हुशार होतकरू विद्यार्थ्यांना नौकरीची संधी उपलब्ध करून दिली.
भारत गिअर्स या नामांकित कंपनीत 51 विद्यार्थ्यांची नौकरी साठी निवडओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मधील सर्व महिला वर्गाने ८ मार्च २०१९ रोजी जागतिक महिला दिनाचे औचीत्त्य साधत "जागर स्त्री शक्तीचा " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत सध्या स्थितीत शैक्षणिक ,सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ,क्रीडा ,विश्वात स्त्री शक्तीचे नेतृत्व करणाऱ्या महिलांना प्रमुख मान्यवर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. .कार्येक्रमाचे उदघाटन ओंकार बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सौ.शुभांगी रवींद्र निकम यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले.
‘ जागर स्त्री शक्तीचा ’ जागतिक महिला दिनकेंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. अशा भ्याड हल्याचा सर्व स्थरावर निषेध होत आहे विशेष म्हणजे युवा वर्गातून प्रचंड राग व्यक्त होत आहे , गोंदूर येथील ओंकार बहू उद्देशीय विकास संस्था संचलित प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्र निकम साहेब ,प्राचार्य प्रकल्प पाटील ,प्राचार्य सागर जाधव,प्राचार्य विशाल बडगुजर ,प्राचार्य चेतन पवार तसेच पॉलीटेक्नीक ,फार्मसी ,ज्युनिअर कॉलेज व पब्लिक स्कूल मधील सर्व प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद ,विद्यार्थी ,यांनी भारतमातेच्या या वीर जवानांना आदरांजली वाहिली.
शहिद जवानांना श्रध्दांजली